जय हनुमान नागरी सह. पतसंस्थेच्या रक्तदान शिबीराचा उपक्रम स्त्युत्य - रणजीत मंत्री, इस्लामपूर.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जय हनुमान नागरी सह. पतसंस्था, जाएंटस ग्रुप ऑफ इस्लामपूर पर्ल व राष्टवादी कॉंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार वाळवा तालुका डॉक्टर सेलच्या संयुक्त विदयमाने आयोजित करण्यात आलेल्या “महा रक्तदान “ शिबीर उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी राजारामबापू बँकेचे अध्यक्ष प्रा. शामराव पाटील, राष्ट्रवादी काग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष व जय हनुमान चे कुटुंब प्रमुख शहाजी पाटील, माजी नगराध्यक्ष भगवान पाटील (आबा) अॅड. राजेंद्र उर्फ चिमन डांगे (भाऊ), अरुणादेवी पाटील, डॉ. अनिल माळी, डॉ. अतुल मोरे, इस्लामपूर शहर डॉ. सेलचे डॉ. सुनील पाटील, मा. नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे, नगरसेवक पिरअल्ली पुणेकर, राष्टवादी महिला शहराध्यक्ष पुष्पलता खरात, युवक राष्ट्रवादी शहाराध्यक्ष दिग्विजय पाटील यांची उपस्थिती होती.
यावेळी प्रा. शामराव पाटील म्हणाले आमदार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जय हनुमान ना. सह. पतसंस्था व अन्य सामाजिक संस्थांनी आयोजित केलेला रक्तदानाचा उपक्रम स्त्युत्य आहे . शहाजी पाटील हे नेहमीच राजकिय व सामाजिक उपक्रमात अग्रेसर असतात त्यांनी यापुढेही समाज उपयोगी उपक्रम राबवावे.
जय हनुमान पतसंस्थेच्या इमारतीमधील हॉलमध्ये हे शिबीर घेण्यात आले. यावेळी शिबीराला उत्स्फुत प्रतिसाद मिळाला. समाजातिल सर्व घटकातील १०७ लोकांनी रक्तदान केले. या शिबीरासाठी संस्थेचे उपाध्यक्ष अनिल जाधव, संचालक अमृत पाटील, अनिकेत शिराळकर, संदिप माने, इंदुबाई मोरे यांचासह संस्थेचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
आभार संचालक रमेश पाटील यांनी मानले.